आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी एकूण २२ व्यक्ती आणि ११ संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी उपक्रमांचा आरंभ करण्यात येणार आहे. सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन श्रेणीतील वैयक्तिक उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार पूर्ण अंधत्व असलेले कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट अमर जैन आणि ७५ टक्के अपंगत्व असलेले प्रतीक खंडेलवाल यांना देण्यात येणार आहे. प्रतीक खंडेलवाल यांनी शहरांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात मदत करण्यासाठी ‘रॅम्प माय सिटी’ हे स्टार्ट-अप सुरू केलं आहे.
Site Admin | December 2, 2024 2:50 PM | President Draupadi Murmu