डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

२०२४चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत वरळी इथं दिमाखदार सोहोळ्यात करण्यात आला. 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गायिका अनुराधा पौडवाल यांना देण्यात आला. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना चित्रपटांसाठीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि कंठसंगीतासाठी गायक सुदेश भोसले यांना प्रदान करण्यात आला.

 

 

 

चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 शिवाजी साटम, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2023, दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. 2023 चा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आशा पारेख यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार एन चंद्रा यांना प्रदान करण्यात आला. राज्यातील नागरिकांच्या वतीनं दिले जाणारे हे पुरस्कार अतिशय अनमोल असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा