जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ७०० शिकाऊ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. १७ अनुकंपाधारकांना देखील आज नियुक्तीपत्र देण्यात आली. युवकांनी या रोजगाराचा अनुकुल वापर करून लोकसेवा करावी, असं आवाहन दादा भुसे यांनी यावेळी केलं.
त्यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावाही घेतला. हा योजना राज्यशासनाची क्रांतिकारी योजना असून महिलांचं आरोग्य, पोषण आणि स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना मिशन मोड पध्दतीनं राबवावी, अशी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.