भारत आणि सौदी अरेबिया या देशांनी, शुद्धीकरण, नवीकरणीय ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल कारखान्यांसहित विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक वाढवण्यासंबंधी चर्चा केली. उभय देशांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय कार्यबलाच्या पहिल्या बैठकीत दोन्ही देशांना फायदेशीर होईल, अशा पद्धतीने गुंतवणूक वाढवण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून काल झालेल्या या बैठकीचं, प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा आणि सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलअजीज बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांनी संयुक्तपणे अध्यक्षपद भूषवलं.
Site Admin | July 29, 2024 3:42 PM