डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

यंदाच्या अर्थसंकल्पावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा

लोकसभेत आज सत्तारूढ आणि विरोधी पक्षांमध्ये झालेल्या जोरदार गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचं कामकाज दोनदा स्थगित करण्यात आलं. काँग्रेसचे सदस्य चरणजीत सिंग चन्नी यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेत बोलताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे आजोबा यांच्या हत्येचा उल्लेख केला. यावरून बिट्टू आणि चन्नी यांच्यात जोरदार वाद सुरु झाला. या गोंधळात पीठासीन अधिकाऱ्यांनी सदनाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर, या मुद्द्यावर चर्चा सुरूच राहिली. बिट्टू यांनी चन्नी यांच्यावर केलेले आरोप नियमाच्या विरोधात असल्याचं काँग्रेस सदस्य के सी वेणुगोपाल म्हणाले, आणि त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. त्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सदस्यांना सभागृहात सभ्यता राखण्याचं आवाहन केलं. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील सदस्यांना सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचं आवाहन केलं.

 

किमान आधारभूत भावासाठी कायदेशीर हमी देण्याची शेतकऱ्यांची मागणी असून, केंद्रसरकारनं तसं आश्वासन दिल्याचं चन्नी यांनी सांगितलं. त्यावर आक्षेप घेत, काँग्रेसच्या खासदारांचं वक्तव्य चुकीचं असून, ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा