डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत सादर

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक २०२४ आज लोकसभेत सादर केलं. या विधेयकाअन्वये २००५च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यात बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्यात येईल. जल जीवन मिशनअंतर्गत देशभरात १५ कोटीपेक्षा जास्त नळ जोडण्या देण्यात आल्याची माहिती जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

 

दरम्यान, वायनाडमध्ये दरड कोसळून झालेली दुर्घटना ही गंभीर स्वरूपाची दुर्घटना म्हणून सरकारने घोषित करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सरकारनं ही घोषणा केल्यानंतर खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी एक कोटी रुपये देणार असल्याचंही थरूर यांनी नमूद केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा