राज्यसभेत आज आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ वर चर्चा सुरू झाली. विधेयकात पीएम केअर्स फंड आणि त्याच्या वापराबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचं काँग्रेसचे नीरज डांगी म्हणाले. त्यांच्या या टिप्पणीचा सत्ताधारी पक्षानं निषेध केला. आपत्तीग्रस्त भागात जलद प्रतिसाद देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल-एनडीआरएफ बटालियनची स्थापना करण्यात आली आहे. २३ जून २०२३ रोजी केंद्र सरकारने १९ राज्यांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल-एसडीआरएफ बटालियनच्या स्थापनेसाठी ६,१९४ कोटी रुपये दिले असल्याचं भाजपच्या ब्रिजलाल यांनी सांगितलं.
Site Admin | March 25, 2025 7:36 PM | Disaster Management (Amendment) Bill 2024
राज्यसभेत ‘आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४’ वर चर्चा
