देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या दर्शनी भागावर फास्ट टॅग नसेल, तर दंड म्हणून दुप्पट टोल वसूल करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्व टोल नाक्यांना दिले आहेत.
अनेक वाहनं दर्शनी भागात काचेवर फास्ट टॅग लावत नाहीत, त्यामुळे टोल वसुलीत वेळ जातो, वाहनांच्या लांब रांगा लागतात आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणानं एक हजार टोल नाक्यांना कठोर कारवाईच्या सूचना जारी केल्या आहेत. देशातल्या ४५ हजार किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावरून रोज सुमारे ८ कोटी नागरिक फास्ट टॅगचा वापर करून प्रवास करतात.