डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पारदर्शक तसंच गतिमान अंमलबजावणीचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश

‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेची विभागात पारदर्शक तसंच गतिमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात या योजनेच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. महिलांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना गावडे केली.या योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात परवा ११ जुलैपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण ७५ हजार ७०२ महिलांनी तर परभणी जिल्ह्यात १९ हजार ५३० महिलांनी अर्ज भरले आहेत. जालना जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेतंर्गत सर्वात जास्त अर्ज नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीनं १५ ऑगस्टला गौरव करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज भरून घेण्यासाठी आज आणि उद्या विशेष शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा