डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत – नाना पटोले

राज्यातल्या कापूस शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश भारतीय कापूस महामंडळाला द्यावेत द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापूस पिकवतात. तरीही २२ लाख गाठी कापसाची आयात झाल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विकल्या न गेलेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत, असं पटोले यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा