डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यातल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती

राज्याचं नाव उज्ज्वल करणाऱ्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारीत धोरणाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यात अशा खेळाडूंना प्रामुख्यानं क्रीडा विभागात नियुक्ती देण्याच्या दृष्टीनं त्यांच्या क्रीडा अर्हतेमधे बदल केले आहेत. त्यानुसार ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत समाविष्ट असलेले सर्व खेळ थेट नियुक्तीसाठी पात्र राहतील. संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तरतुदींची पूर्तता करणारे खेळाडू थेट नियुक्तीसाठी पात्र ठरतील. या नियुक्तींसाठी शालेय आणि क्रीडा विभागाच्या अधिपत्याखाली एकूण ५५१ पदं निर्माण केली जाणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा