राज्य सरकारनं खरीप हंगाम २०२४-२५ करता आधारभूत खरेदीसाठी निश्चित केलेल्या हमीभावानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीची नोंदणी सुरु असून या तिन्ही उत्पादनांच्या प्रत्यक्ष खरेदीला येत्या १० तारखेपासून सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या नजीकच्या नाफेड खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह नोंदणी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
Site Admin | October 5, 2024 9:09 PM | खरीप हंगाम | नोंदणी
मूग, उडीद, सोयाबीन या तिन्ही उत्पादनांच्या प्रत्यक्ष खरेदीला येत्या १० तारखेपासून सुरुवात
