भारताच्या युवाशक्तीकडे आज सारे जग आशेने पाहत असून २०४७ मधल्या विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना हीच युवाशक्ती भारताचे नेतृत्व करेल, असं नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला आज दिलेल्या भेटीत ते बोलत होते. राष्ट्रीय छात्रसेनेच्या देशभक्ती, समाजसेवा आणि वचनबद्धता या मूल्यांच्या अंगिकारामुळे युवकांना आदर्श नागरिक बनण्यास मदत होईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय छात्रसेना आणि नौदलाच्या संयुक्त प्रयत्नामुळे राष्ट्रीय सुरक्षा अधिक प्रभावीपणे राखण्यात यश येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 6, 2025 8:36 PM
विकसित भारताकडे वाटचाल करताना युवाशक्ती भारताचे नेतृत्व करेल-नौदल प्रमुख
