आषाढीवारी निमित्त पंढरपूरात येणाऱ्या पायी दिंड्यांना प्रति दिंडी २० हजाराचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार दिंडी चालकांच्या खात्यात प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं मान्यता दिली आहे. प्रत्येक दिंडी चालकांनी दिंडीची संपूर्ण माहिती, बँक खाते क्रमांक कळविण्याचं आवाहन शासनानं केलं होतं. त्यानुसार किमान ८४७ दिंड्या येत असल्याची प्राथमिक माहिती शासनाला प्राप्त झाली होती. आता पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी संस्थान आळंदी यांच्याकडून जवळपास १७० दिंड्याची परिपूर्ण माहिती शासनाला देण्यात आली असून उर्वरित दिंड्यानी तातडीनं शासनाला माहिती सादर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Site Admin | August 25, 2024 3:35 PM