केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज नवी दिल्लीत गोड पाण्यातल्या जैववैविध्यतेच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजीटल व्यासपीठाचा आरंभ केला. या माध्यमातून गंगा, कावेरी आणि गोदावरी सारख्या प्रमुख नद्यांच्या भौगोलिक संरचना, जैव विविधता आणि सार्वजनिक सहभागातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. राष्ट्रीय स्वच्छ गंगा प्रकल्पातंर्गत त्यांनी देशातल्या वन्यजीव संस्थांच्या विविध योजनांचा यावेळी आढावाही घेतला.
Site Admin | April 17, 2025 8:12 PM | Biodiversity | Digital Platform | Freshwater
गोड पाण्यातल्या जैववैविध्यतेच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजीटल व्यासपीठाचा आरंभ
