डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 21, 2024 1:36 PM | Digital Payments

printer

डिजिटल पेमेंट व्यवहारांचं प्रमाण १९ हजार कोटींपर्यंत गेल्याची अर्थ मंत्रालयाची माहिती

२०२३-२४ या आर्थिक वर्षात देशभरात डिजिटल पद्धतीने झालेल्या व्यवहारांमध्ये वाढ झाली असून १९ हजार कोटी डिजिटल व्यवहार झाले आहेत . २०१७-१८ या आर्थिक वर्षात २ हजार कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार झाले होते. या कालावधी दरम्यान युपीआय अर्थात यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस च्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांमध्ये देखील ९० कोटींनी वाढ झाली असून १३ हजार कोटींहून अधिक युपीआय व्यवहार या काळात झाले आहेत. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात युपीआयच्या माध्यमातून २०० लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण देशभरात झाली आहे. सध्या संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, आणि मॉरीशस या ७ देशांमध्ये युपीआय व्यवहार सुरु आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा