निवृत्तीवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजीटल स्वरुपातील हयातीचा दाखला अर्थात DLCदेण्याच्या अभियानानं आतापर्यंत एक कोटी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती कार्मिक मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल दिली. या अभियानामुळे ज्येष्ठांना सहज आणि सोप्या पध्दतीनं हयातीचा दाखला उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आकाशवाणीवरील मनकी बात कार्यक्रमांत या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. देशभरातील आठशे शहर आणि गावांमध्ये अभियानाची तिसरी आवृत्ती राबवण्यात आली असून 1 ते 25 नोव्हेंबरदरम्यान 19 शे हून अधिक शिबीरांचं आयोजन करण्यात आल्याची माहितीही डॉ सिंग यांनी दिली.
Site Admin | November 27, 2024 10:06 AM | Digital Life Certificate