डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

धुळे जिल्ह्याला आज रेड अलर्ट

धुळे जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला. पावसामुळे धुळे आणि साक्री तालुक्यातल्या जल प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.  मालनगांव, पांझरा, जामखेली प्रकल्प भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अक्कलपाडा धरणातून आज दुपारी २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला असून नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जालना जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. भोकरदन तालुक्यात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पद्मावती धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. 

जळगाव शहरासह जिल्ह्याच्या काही भागात दुपारी जोरदार तर बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडला

सर्वाधिक वाचले

सर्व पहा