विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं धुळे जिल्हा पोलिस दलानं धुळे जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ६ पिस्तुलं, ८ जिवंत काडतुसं, १६ तलवारी, १ कोयता, गुप्ती अशी घातक शस्त्रे याच्यासह विदेशी, देशी मद्यसाठा, अंमली पदार्थ, गांजा, गुटखा मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. पोलिसांनी १७ फरार आरोपींना अटक केली असून २४ लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. ही माहिती धुळे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज दिली.
Site Admin | October 23, 2024 3:49 PM | Dhule | Police
धुळे जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई
