धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या अनेर डॅम या निसर्गसंपन्न स्थळाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचा विकास आराखडा सादर करण्याच्या सुचना वन्यजीव विभागाला दिल्या आहेत. या पर्यटन स्थळात पॅगोडा, टेहळणी टॉवर, टेन्ट हाऊस, बोंटीग, साहसी खेळ आणि ट्रेकींगसारख्या सुविधा उपलब्ध असाव्यात असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलं आहे. त्याव्यतिरिक्त देशी प्रजातीचे वृक्ष आणि बांबु लागवडीच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
Site Admin | February 14, 2025 7:32 PM | Aner Dam | Dhule
धुळ्यातल्या अनेर डॅमचा विकास होणार
