महसूल गुप्तचर संचालनालयानं धुळे जिल्ह्यातल्या बेकायदेशीर गांजा लागवडीवर कारवाई केली आहे. खामखेडा आंबे आणि रोहिणी गावात गांजाची लागवड होत असल्याची खबर कळताच ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे ९ एकरांहून अधिक जमिनीवर सात वेगवेगळ्या ठिकाणी गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणांहून गांजाची ९६ हजार ४९ झाडं जप्त करण्यात आली.
Site Admin | April 2, 2025 8:02 PM | Dhule
धुळ्यात बेकायदेशीर गांजा लागवडीवर कारवाई
