धुळे जिल्ह्यात शंभर दिवसांच्या ई ग्राम संवादाला आजपासून सुरुवात झाली. दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकारी नागरिक आणि प्रशासनाशी संवाद साधतील. तसंच गावातल्या तक्रारी, शासकीय योजनांची अंमलबजावणी याची माहिती घेऊन त्याचं निराकारण १५ दिवसांत करतील.
Site Admin | February 20, 2025 7:53 PM | Dhule
धुळ्यात १०० दिवसांच्या ई ग्राम संवादाला सुरुवात
