धुळे शहरातील एका लॉज मधून चौघा बांगलादेशी नागरीकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. वैध कागदपत्राशिवाय बेकायदेशिररित्या हे चार जण राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या चौघांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
Site Admin | December 23, 2024 6:31 PM | Dhule