राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे लाभ देशातील प्रत्येक मुलाला मिळणं ही केंद्र सरकारची वचनबध्दता असल्याचं केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांना लिहीलेल्या पत्रांत म्हटलं आहे. तामिळनाडू राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा योजनेचा लाभ झाला आहे. नवीन शैक्षणिक धोरण तमिळनाडूच्या शाळांमध्ये तमिळ शिकविण्याच्या कल्पनेला पूर्ण समर्थन देते असं या पत्रांत अधोरेखित करण्यात आलं आहे. तमिळ ही जगातील सर्वात जुनी अभिजात भाषा आहे आणि ही राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे.असंही प्रधान यांनी आपल्या पत्रांत नमूद केलं आहे. पीएमश्री योजनेअंतर्गत सांमजस्य करार करण्यासंदर्भात तामिळनाडू राज्य सरकारनं दिलेल्या प्रतिसादाला उत्तर देताना प्रधान यांनी हे पत्र लिहीलं आहे.
Site Admin | August 31, 2024 12:26 PM