शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी निधी वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. दिल्ली विश्वविद्यालयात सर्मपण सोहळ्याचं उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
सशक्त बेटी आणि ई-दृष्टी योजनांचं उद्घाटन प्रधान यांनी या कार्यक्रमात केलं. या योजनांर्तंगत अनाथ तसंच एकल माता असलेल्या दृष्टीबाधित विद्यार्थींनीना लॅपटॉप आणि टॅबलेटचं वाटप प्रधान यांनी केलं. दिल्ली विश्वविद्यालयात रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध केली असून त्याचं उद्घाटनही धर्मेंद्र प्रधान यांनी केलं.
दिल्ली विद्यापीठात उच्चशिक्षण घेणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं ध्येय्य असतं. भविष्यात विश्वविद्यालयात ज्ञानाधारित अर्थव्यवस्था विकसीत करण्यावर भर देणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं.