धाराशिव तालुक्यातील पळसप इथं दहावं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमलेनाचं उद्धाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या साहित्य संमेलनात संविधानाच अमृत महोत्सव आणि मानवी मूल्ये या विषयावर परिसंवाद होणार असून कथाकथन, कवी संमेलन होणार आहे.
Site Admin | January 27, 2025 3:30 PM | Dharashiv
धाराशिवमध्ये २ फेब्रुवारीपासून १०वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन
