महाराष्ट्राच्या विविध भागातल्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ करण्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू केली आहे.
या कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत सह्यादी अतिथीगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता राज्यातल्या ऊर्जा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचं वेतन हे अन्य राज्यांमधल्या कंत्राटी कामगारांपेक्षा सर्वांत जास्त झालं आहे. त्याबरोबरच आता या कंत्राटी कामगारांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू केली जात असल्याचंही फडनवीस यांनी जाहीर केलं.