राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तसंच उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधीही होणार आहे. भाजपाच्या गाभा समितीच्या काल झालेल्या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. या प्रक्रियेसाठी मुख्य निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यावेळी उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड जाहीर करण्यात आली.
Site Admin | December 5, 2024 8:26 AM | Devendra Fadnavis | Maharashtra CM