प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं भाजपाचं सरकार खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करत आहे, असं प्रतिपादन भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. महाविकास आघाडीनं भाजपामुळे आरक्षण जाणार, संविधान बदलणार अशी खोटी कथानकं रचून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी केली. मात्र काँग्रेसचा दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Site Admin | November 13, 2024 3:09 PM | DCM Devendra Fadnavis
भाजप खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
