डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रार्थनास्थळावरचे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद, मर्यादित कालावधीसाठीच परवानगी

प्रार्थनास्थळांवरच्या भोंग्यांची आवाजाची मर्यादा आणि यासंदर्भातल्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आता संबंधित पोलिस ठाण्याच्या निरिक्षकांवर सोपवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी भाजपाच्याच सदस्य देवयानी फरांदे यांनी उपस्थित केली. सद्यस्थितीत या नियामंचं पालन होत नसल्याचं दिसून आलं आहे, मात्र, आगामी काळात या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मद्यविक्री दुकानं नव्या जागेवर स्थलांतरित करण्यापूर्वी तिथल्या गृहनिर्माण सोसायट्यांचं ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. त्यासाठी नियमात आवश्यक बदल करणार असल्याचं ते म्हणाले. दारूबंदीसाठी गावात अथवा वॉर्डातल्या मतदानात दारूबंदीच्या बाजूनं ७५ टक्के मतदान झालं, तर दारू दुकानाची मान्यता रद्द करण्याच्या अनुषंगानंही नियमात बदल करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

 

सध्याच्या नियमात यासाठी ५० टक्के मतदानाची तरतूद आहे, त्यामुळे हा नियम बदलावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार, राहुल कुल, वरूण सरदेसाई यांनी केली होती.मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात घुसखोरी केलेल्यांना हटवण्यासाठी धोरण तयार केलं जाईल अशी घोषणा मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा