राज्यातल्या पोलीस पाटलांच्या गेल्या ४ महिन्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्या शासननिर्णय निर्गमित करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पोलीस पाटील संघाच्या ८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते आज नागपूर इथं बोलत होते. पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचं वय ६५ वर्षं करण्याच्या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असंही ते म्हणाले. पोलीस पाटील हे गावचे गृहमंत्री असतात, कायदा सुव्यवस्थेसह या संरचनेत आता महिलासुरक्षा हे महत्वाचं कर्तव्य आहे. त्यासाठी पोलीस पाटलांनी अधिकाराबरोबरच कर्तव्याच्या जाणीवेतून कार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं. राज्य शासनानं या पदाला मान आणि मानधन मिळावं म्हणून वाढीव १५ हजार रुपये मानधन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | September 1, 2024 3:46 PM | DCM Devendra Fadnavis
पोलीस पाटलांच्या थकित मानधनाचा प्रश्न मार्गी लागणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
