राज्याला कृषी, वीज निर्मिती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यात गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री आणि मंडळाच्या उपाध्यक्ष मेघना बोर्डीकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Site Admin | December 28, 2024 7:16 PM | CM Devendra Fadnavis