2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या दिशेनं लक्ष केंद्रित करण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करायला हवा असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांसोबतच्या बैठकीत बोलत होते. ‘जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या विकासाची गती कायम राखणं’ या मध्यवर्ती संकल्पनेवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुभ्रमण्यम आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.