डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भविष्यातील तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञान कौशल्य विकसित करा – मंत्री  नितीन गडकरी

आपल्या प्रदेशाची गरज लक्षात घेऊन भविष्यात कोणतं तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे, याचा विचार करा आणि त्यानुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करा, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी औद्योगिक कंपन्यांना केलं आहे.

 

विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्‍तपणं स्‍थापन केलेल्या वेदिक-मह‍िंद्रा कौशल्‍य विकास केंद्राचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते. देशाला पेट्रोल-डिझेलमुक्‍त करण्‍याचं आपलं ध्‍येय असल्‍याचं त्यांनी सागितलं. 

 

ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी परिसरातील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत सुरू केलेल्या अद्यावत सुविधा असलेल्या केंद्राचीही गडकरी यांनी यावेळी पाहणी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा