रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवरहाटी जमिनींवरच्या विकासकामांसाठी येत्या १५ दिवसांत महसूल आणि वन विभागाने अहवाल सादर करावेत, असे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज दिले. कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. देवरहाटी जमिनीच्या विकासाचा प्रश्न संवेदनशील असला तरी न्यायालयीन निर्णय, कायदेशीर बाबी आणि स्थानिक जनतेच्या भावना यांचा समतोल राखूनच निर्णय घेतला जाईल, असंही कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Site Admin | April 9, 2025 7:22 PM | Devarhati Lands | Ratnagiri | Sindhudurg
देवरहाटी जमिनींवरच्या विकासकामांसाठी अहवाल सादर करण्याचे महसूल राज्यमंत्र्यांचे आदेश
