डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 25, 2024 3:29 PM | CM Devendra Fadnavis

printer

नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार

नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते. गडचिरोली ही भारताची दुसरी स्टील सिटी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या कार्यकाळात आपण विदर्भात सिंचनाचे 80 प्रकल्प पूर्ण केले याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्राचे प्रकल्प देखील पूर्ण केले. ऊर्जा विभागाचा मंत्री म्हणून त्या क्षेत्रातल्या पुढच्या पंचवीस वर्षाचा रोड मॅप तयार असल्याचा उल्लेख त्यांनी केला. पुढच्या दोन वर्षात उद्योगासहित सर्वच प्रकारच्या विजेचे दर कमी करता येतील, अशी व्यवस्था निर्माण करण्यावर आपला भर असल्याची माहिती त्यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत जनतेने बहुमत दिलं त्याबरोबर अपेक्षाही आल्या आहेत आणि आपली जबाबदारी वाढली आहे असं ते म्हणाले. सहा नदीजोड प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हमीभावासंदर्भात इतर राज्यांच्या धोरणाचा अभ्यास केला जाईल असं सांगून कापूस आणि सोयाबीन यासह अन्य पिकांच्या खरेदीत सुलभता आणण्याचा सरकारचा विचार असल्याचं ते म्हणाले.
एकूणच केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला वेगानं पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. पीएम आवास योजनेअंतर्गत एका वर्षात विक्रमी संख्येने वीस लाख घरे देण्यात येत आहेत असं त्यांनी यावेळी नमूद केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा