केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं इयत्ता पाचवी आणि आठवीत सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण आज रद्द केलं. आता अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकणार नाहीत. त्यांना दोन महिन्यांच्या आत फेरपरीक्षा देऊन पुढच्या वर्गात जाता येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी दिली.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या चांगल्या भवितव्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं कुमार यांनी सांगितलं.