वारकरी संप्रदायातील वैचारिक नेतृत्व आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांचं काल आकस्मिक निधन झालं. ते 30 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.