डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला आहे. मराठा आरक्षण तसंच सगेसोयऱ्यांच्या मुद्दयावर मुख्यमंत्री शिंदे यांना काम करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे मात्र त्यांना देवेंद्र फडनवीस काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर फडनवीस यांनी आज बातमीदारांशी बोलताना उत्तर दिलं. मराठा समाजासाठी आजपर्यंत जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिलो आहे, त्यांना पाठबळ दिले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील हे जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करत असल्याचं फडनवीस यांनी म्हटलं आहे. जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारावं, मराठा आरक्षणाकरिता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो थांबवला, असं त्यांनी सांगितलं तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईन, असं फडनवीस म्हणाले. 

 

दरम्यान फडनवीस यांच्यावरचे आरोप चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. फडनवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ते मराठा समाजाला विरोध करतात, हा आरोप पुर्णपणे चुकीचा आहे. आम्ही सर्वजण एकत्रितपणे निर्णय घेतो, असं शिंदे यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा