पुढच्या पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरं उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते आज ठाण्यात कोकण विभागातली म्हाडाची लॉटरी काढताना बोलत होते. लोकांचा विश्वास म्हाडावर आहे, त्यामुळे लॉटरी निघाल्यावर घरांचा ताबा लवकर द्या, चांगल्या दर्जाचं घर द्या, घरांची गुणवत्ता आम्ही तपासू, असंही त्यांनी सांगितलं. म्हाडानं गेल्या दीड वर्षात ३ लॉटरी काढल्या असून यापुढंही म्हाडाच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं लॉटरी काढली जाणार आहे. दरवर्षी म्हाडाच्या माध्यमातून ३० हजार घरांची लॉटरी काढली जाणार असल्याचं माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी, यावेळी सांगितलं.
Site Admin | February 5, 2025 7:11 PM | Eknath Shinde | Mhada
येत्या पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरं उभारण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
