डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं नेतृत्त्व करतील – चंद्रशेखर बावनकुळे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपाचे नेते असून तेच राज्याचं नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते. सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती भाजपाच्या सर्व आमदारांनी आणि पक्ष सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी आखलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्यासाठी भाजपा महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, असंही ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा