नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात कोटमगाव इथं असलेल्या श्री जगदंबा देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार यांनी आज विधिमंडळाच्या समिती कक्षात देवस्थान विकास आराखड्याबाबत बैठक घेतली. या देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांसाठीचा प्रस्ताव ग्राम विकास विभागाने नियोजन विभागाकडे पाठवावा आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांनी देखील याबाबत बैठक घ्यावी असे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले.
Site Admin | June 27, 2024 6:48 PM | अजित पवार | श्री जगदंबा देवस्थान
जगदंबा देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश
