डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या ५ तारखेला आर्थिक मदतीचे पैसे खात्यात जमा करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, यासह विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. तसंच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या खेळाडूंना अर्हतेनुसार शासकीय नोकरी मिळण्याच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आवश्यकतेनुसार निकषांमध्ये बदल करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं. 

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल , असं आश्वासन त्यांनी दिलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, माजी अध्यक्ष नाना पटोले आदी सदस्यांनी विधानसभेत ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला होता. मात्र, अध्यक्षांनी स्थगन फेटाळल्यानंतरही सभागृहात यासंदर्भात पवार यांनी निवेदन दिलं. 

राज्यात विविध ठिकाणी स्फोटक किंवा तत्सम कारखान्यांमध्ये होणाऱ्या स्फोटांचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. या घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई वाढवून देण्याची मागणी विरोधकांनी केली. या प्रकरणात, आत्तापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. दोषींवर कारवाई करू तसंच नुकसानभरपाई वाढवून देण्याबाबत योग्य निर्णय घेऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा