दुधातली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, आणि पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक निधी देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा फायदा एक लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतला असल्याचं निष्पन्न झालं आहे, ज्यांनी पात्र नसतानाही याचा लाभ घेतला अशा तीस हजार तीनशे त्रेपन्न शिधापत्रिका धारकांवर ते नोकरीला असलेल्या विभागांमार्फत कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.