मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होईल असं म्हटलं आहे. राज्यातल्या २ कोटी महिलांना लाभ मिळालेली ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक योजना असल्याचंही पवार आपल्या संदेशात म्हणाले.
Site Admin | October 3, 2024 3:14 PM | उपमुख्यमंत्री अजित पवार | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
