मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या खोट्या असून राजकीय हेतून प्रेरित असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वर्ष २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही योजना सादर करण्यात आली आहे. वित्त आणि नियोजन विभाग तसंच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा करण्यात आल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. या योजनेत अधिकाधिक महिलांना सहभागी करून घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
Site Admin | July 27, 2024 7:14 PM | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या खोट्या असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
