राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत राज्यस्तरीय मेळाव्याचं उद्घाटन पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. राज्यभरात जिल्हास्तरावल्या ३५ तर तालुकास्तरावल्या ३५५ शाळांमधे हा मेळावा होत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत शून्य ते १८ वर्षे वयोगटातल्या मुला मुलींची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
जन्मजात आजार आणि इतर आजारांवर मोफत उपचार तसंच संदर्भ सेवा आणि विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बालकाचं आरोग्य हे देशाच्या दृष्टीने महत्वाचं असतं. त्यामुळे सर्वांनी आपल्या बालकांची आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.