तेविसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल बारामती इथं करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आयोजित होणाऱ्या कबड्डी, खोखो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे 75 लाख रुपयांचं अनुदान वाढवून एक कोटी रुपये करण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली. स्पर्धेत 16 महिला आणि 16 पुरुष संघ आणि 600 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.