कृषी क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन असून त्यासाठी व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. पीक आरोग्याचं विश्लेषण, मातीतल्या कार्बनचं प्रमाण शोधणं, मातीच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती, तणाचे प्रकार ओळखणं, मातीचं तापमान, पिकांवरची कीड तसंच रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं एआयच्या वापरामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे एआयच्या प्रायोगिक तत्त्वावर वापरासाठी या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.