देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी सुमारे ५० उड्डाणांना विलंब झाला. तसंच दिल्लीला जाणाऱ्या २४ रेल्वेगाड्या पाच तास विलंबानं धावत आहेत, असं रेल्वेनं सांगितलं.